मुंबई : सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात प्रामुख्याने चर्चिला जाणार विषय म्हणजे रोजगार, तर आता चक्क एआयमुळे मिळू शकते गलेलठ्ठ पगाराची नोकरी. जर तुम्ही एआय तंत्रज्ञानात परिपूर्ण असाल तर तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात. ज्यांना एआय समजते ते व्यावसायिक करोडपती देखील बनू शकतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. दिग्गज लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने अशीच एक ऑफर आणली आहे जिथे एआय व्यावसायिकांना करोडपती बनण्याची संधी मिळत आहे.
दरम्यान, या पोस्टकरिता नेटफ्लिक्सकडून तब्बल ९ लाख डॉलर म्हणजेच सुमारे ७.४ कोटी रुपये वार्षिक वेतन मिळणार आहे. वास्तविक, अमेरिकन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्ट मॅनेजरची नियुक्ती करत आहे. एआय मॅनेजरचे काम हे नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे व कंटेट तयार करण्यासाठी मदत करणे असणार आहे.
हॉलीवूडमध्ये एआय विरुद्ध प्रहार
या नोकरीसाठी उमेदवाराकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय मशीन लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करण्याचाही अनुभव असावा. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये AI च्या जाहिरातीमुळे हॉलिवूडमध्ये तीव्र विरोध होत आहे. अमेरिकेतील लेखक आणि कलाकारांच्या अनेक संघटना संपावर आहेत.