लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान

ठाणे महापालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’

    30-Jul-2023
Total Views | 52
lecture-on-the-death-anniversary-of-lokmanya-tilak

ठाणे
: भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’, यावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून व्याख्यान सर्वासाठी खुले आहे. विचारमंथन व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

समीक्षक, इतिहासकार, कीर्तनकार-प्रवचनकार डॉ. सदानंद मोरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून तत्वज्ञान विषयाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख आहेत. ‘लोकमान्य ते महात्मा’ हा द्विखंडात्मक ग्रंथ, ‘तुकाराम दर्शन’ हे सांस्कृतिक इतिहास लेखन, ‘कर्मयोगी लोकमान्य’ हे लोकमान्य टिळक यांचे चरित्र आदी त्यांची ग्रंथसंपदा आहे. घुमान येथे भरलेल्या ८८व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाचा आजच्या काळात पुन्हा परिचय व्हावा, त्यातून श्रोत्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी समीक्षक, इतिहासकार, कीर्तनकार-प्रवचनकार डॉ. मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121