मुंबई : विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी राजकीय बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दुसरा धक्का उद्धव ठाकरेंकडून दिली जाण्याची शक्य आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंना 'एकला चलो रे' चा सल्ला दिला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसात आपली भुमिका मांडणार आहे. मात्र ही भुमिका मांडताना उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना वाटते तशी 'स्वंतत्र चलो' ची भुमिका घेतली. त्यामुळे ठाकरेंनी "केला चलो हा नारा द्यावा आणि पुढच्या राजकीय कामकाजात सहभागी व्हावं. ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे”, असे ही विनायक राऊत म्हणाले.