डोंबिवलीत प्रथमच मिळणार मायक्रो टिसा पध्दतीचे उपचार

आई बाबा न होऊ शकणाऱ्या दाम्पत्यांसाठी आशेचा किरण

    03-Jul-2023
Total Views | 46
 
dr. patki
 
 
 
डोंबिवली पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट शून्य असला तरी सर्जिकल मायक्रो स्कोपच्या साहाय्याने त्यांच्या शरीरातील स्पर्म शोधून काढता येतो. याला‌ मायक्रो टिसा असे संबोधले जाते. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट शून्य असल्यास बहुतांश आयव्हीएफ सेंटर मध्ये ते दाताकडून घेतले जातात. मात्र मायक्रो टिसा या पध्दतीचा वापर करणारे आयव्हीएफ स्पेशालिस्ट डाॅक्टर महाराष्ट्रात केवळ दोनच आहे. अशा पध्दतीची उपचार आता डोंबिवलीत मिळणार असल्याने आई बाबा होता न येणाऱ्या दांपत्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. या पध्दतीचा वापर करून ३५ टक्के जोडप्यांना स्वतःच्या टिश्यूमधून बाळ झाले आहे. ३५ टक्के हा आकडा जरी लहान दिसत असला तरी विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ही गोष्ट मैलाचा दगड ठरली आहे, अशी माहिती आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. चिन्मय पत्की यांनी दिली आहे.
 
डोंबिवलीत ईशा वुमेन्स केअर आयव्हीएफ रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रूग्णालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. पत्की यांनी उपरोक्त माहिती दिली. मध्यमवर्गीयांना जोडप्यांना आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी उच्च तंत्रज्ञान युक्त उपचार पद्धती डोंबिवलीत सुरु होत आहे. याचा लाभ मध्यमवर्गीय - गरीब कुटुंबातील जोडप्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ. पत्की यांनी केले आहे.
डॉ . पत्की म्हणाले, ईशा वुमेन्स केअर रुग्णालयात स्त्री वंध्यत्वावरील उपचार पध्दती सोबत पहिल्यांदा पुरुष वंध्यत्वावरील उपचार पद्धती सुरु करण्यात येत आहे. पुरुष वंध्यत्वावर उपचार करणारे भारतात पाच सेंटर देखील नाही. पण हे उपचार आता डोंबिवलीत होणार आहेत. या रूग्णालयात अत्याधुनिक उपचार करण्यात येणार आहेत. स्पर्म काऊंट शून्य आल्यानंतर अनेक जण उपचारासाठी पुढे जातच नाही. परिणामी उपचार तिकडेच थांबतात. परंतु स्पर्म शून्य आलेल्या पुरूषांना नवीन पद्धती बाबत माहितीच नाही. त्यांच्या शरीरातून एखादा स्पर्म काढून त्यांचा वापर टेस्ट ट्यूब बेबी साठी केला जातो. भारताबाहेर दाम्पत्य आपल्याचा अंडाशय किंवा शुक्राणूचा वापर करून टेस्ट ट्यूब बेबी करावे असे आग्रह धरतात पण भारतात त्याविषयी जागरूकता कमी दिसून येते. तसेच या बाबतीत पूर्णत गोपनीयता पाळण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
 या मिळणार सुविधा
 
हाॅस्पिटलमध्ये आय व्ही एफ लॅप्रोस्कोपी आणि मॅटर्निटीच्या सुविधा आहे. बाळंतपणासाठी सुद्धा उच्च दर्जाची सेवा देण्यात येईल. आय वी एफ उच्चतंत्रज्ञानाने अवगत असे केंद्र रूग्णालयाच्या माध्यमातून होत आहे. संगणकाद्वारे गर्भाच्या वाढीचे अनुमान, आयव्हीएफ प्रयोगशाळेची बांधणी, शुद्ध हवेचा दर्जा, गर्भाच्या वाढीसाठी लागणाऱ्या पर्यावरणाची निर्मिती उच्च तंत्रज्ञानाने युक्त आहे. एखाद्या स्त्री व पुरुषाला बाळ हवे असल्यास गरोदरपणापासून ते बाळंतपणापर्यंतचा आधुनिक तंत्रज्ञाने युक्त असा सुखकर प्रवास एकाच छताखाली व्हावा यासाठी इशा वुमेन्स हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. पुरुषांच्या वंध्यत्वावर असलेली शून्य शुक्राणू तपासणीवरील मायक्रो टिसा पद्धती, आय वी एफ मध्ये जनुकीय निदान, टाईमलॅप्स तंत्रज्ञान द्वारे तपासण्या ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हॉस्पिटल तर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांना सीएसआरच्या माध्यमातून फार्मा कंपन्याद्वारे निधी उपलब्ध होऊ शकतो किंवा अनेक विमा कंपन्या उपचारासाठी अटी नियमानुसार आर्थिक सहाय्य करु शकतात. जगातल्या उच्च तंत्रज्ञानाचा फायदा कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील नागरिकांनी ईशा हाॅस्पिटलच्या वतीने घ्यावा असे आवाहन डॉ. चिन्मय पत्की यांनी केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121