सारथी, बार्टीसह महाज्योतीच्या सर्व योजनांमध्ये सुसूत्रता आणणार : मंत्री अतुल सावे
29-Jul-2023
Total Views | 126
मुंबई : 'सारथी', 'बार्टी' तसेच 'महाज्योती'च्या सर्व योजनांमध्ये लवकरच सुसूत्रता आणणार आहोत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच, , महाज्योती संस्थेमार्फत सन २०२२-२३ मध्ये एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणाकरिता ४,९६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४,२११ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होते. सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करून ६,५०० करण्यात आली आहे.
दरम्यान, 'महाज्योती' संस्थेने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते.