नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या दुकानदारांना मिळणार पन्नास हजार!

    29-Jul-2023
Total Views |

Eknath Shinde 
 
 
मुंबई : राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाने सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
 
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना शासनाने आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या 75 टक्के रक्कम वा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.