वीवर्क इंडियाची पुणेकरांसाठी मोठी घोषणा
४ लाख चौरस फूट कार्यालयाची जागा भाडेतत्त्वावर घेणार
नवी दिल्ली: कॉर्पोरेट ग्राहकांना मॅनेज्ड वर्कस्पेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध कंपनी वीवर्क इंडिया पुण्यातील रिअल इस्टेट डेव्हलपर पंचशील रियल्टीकडून चार लाख चौरस फूट ऑफिस स्पेस भाडेतत्त्वावर घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.सध्या वीवर्क इंडियाचे दिल्ली एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) ,मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद मधील ४८ ठिकाणी ६.५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्र आहे.
वी वर्क कंपनी अनेक उद्योजक, नोकरदारांना भाडेतत्वावर कामासाठी जागा देते. अनेक क्षेत्रातील औद्योगिक कार्यालय एकत्र शेअर करतात. एक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, नियोजन यामुळे कार्यालय शेअर करण्याची पद्धत सध्या लोकप्रिय ठरली आहे. आस्थापनेवरील खर्च आटोक्यात ठेवून चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी हल्ली कंपन्या हा मार्ग निवडतात. ज्या मध्ये सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा सहभाग दिसतो.
स्पेस शेअरिंग संकल्पनेसाठी प्रसिद्ध असलेल्या 'वी वर्क 'कंपनी पचशील रियल्टीच्या इलेव्हन वेस्ट या दोन इमारतींमध्ये चार लाख चौरस फूट कार्यालयाची जागा घेणार आहे.