मणिपूर हिंसाचार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; 10 आरोपींना केली अटक
28-Jul-2023
Total Views | 95
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि कटाशी संबंधित सहा एफआयआर नोंदवले आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. गँगरेप (व्हायरल व्हिडिओ प्रकरण) प्रकरणी सीबीआय नवीन एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मणिपूरमध्ये तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. मणिपूर हिंसाचाराची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली होती. याविषयी कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, केंद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड केल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.
गृह मंत्रालयाने आपले सचिव अजय कुमार भल्ला यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, या खटल्याची सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी हा खटला मणिपूरच्या बाहेर चालवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.