कोरेगाव भीमा प्रकरण; संशयित नक्षलवादी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेराला सशर्त जामीन

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

    28-Jul-2023
Total Views |
Koregaon Bhima Case Conditional bail To Gonsalves And Ferreira

नवी दिल्ली
: कोरेगाव भीमा येथील २०१८ सालेल्या हिंसाचारातील आरोपी आणि संशयित नक्षलवादी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर संशयित नक्षलवादी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजुर केला आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, संबंधित व्यक्तींवरील आरोप गंभीर आहेत. मात्र, आरोप गंभीर असले तरी याचा अर्थ जामीन देता येणार नाही असा नाही. आरोपींना १९६७ च्या कायद्यान्वये दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे जामीन देताना आरोपींवर अटी घालण्याचा निर्णय घेऊन जामीन मंजुर केला आहे.

यावेळी न्यायालयाने दोघा संशयित नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र सोडून न जाण्याची अट घातली आहे. त्याचप्रमाणे दोन्ही आरोपींनी त्यांचे पासपोर्ट सरेंडर करावे; दोघांनी मोबाईल फोनच वापराणे;आपल्या पत्त्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्याला कळविणे; मोबाईल नंबर एनआयएस कळविणे आणि मोबोईल फोन चोवीस तास चार्ज केला जावा आणि ट्रॅकिंगसाठी एनआयए अधिकाऱ्यांना लोकेशन कळविणे यादेखील अटी घालण्यात आल्या आहेत. जर अटींचे उल्लंघन झाले असेल आणि आरोपींना साक्षीदारांना धमकविण्याचा प्रयत्न केला तर जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.