वीरेंद्र कश्यपशी लग्न करून फरजाना बनली 'सरस्वती'!

    26-Jul-2023
Total Views |
uttar-pradesh-farzana-became-saraswati-married-with-virendra-kashyap-in-hindu-temple

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केले आहे. फरजाना नावाच्या या मुलीने आपले नवीन नाव सरस्वती ठेवले आहे. तिने २५ जुलै रोजी वीरेंद्र कश्यप कश्यपसोबत एका मंदिरात वैदिक रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांचे सुमारे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. फरजानाने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याचबरोबर तिने आपल्या आणि पतीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे.

फरजाना ही मूळची बरेलीच्या शेरगड पोलीस स्टेशन हद्दीतील गहलुईया गावची रहिवासी आहे. वीरेंद्र कश्यप हा त्याच्या शेजारच्या माधोपूर गावचा रहिवासी आहे. भूतबाधा काढण्याचे काम वीरेंद्र करतो. फरजानाचे वडिल तिच्यावरील भूतबाधा काढण्यासाठी तिला वीरेंद्र कश्यप यांच्याकडे घेऊन गेले होते. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम संबध निर्माण झाले. दोघांनीही घरच्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र फरजानाच्या घरच्यांनी तिचे ऐकले नाही. उलट दोघांच्या भेटीवर बंधने घालण्यात आली.
 
२२ जुलै रोजी वीरेंद्र फरजानासोबत गावापासून दूर कुठेतरी गेला. फरजानाच्या वडिलांनी शेरगड पोलीस ठाण्यात वीरेंद्रविरुद्ध एफआयआर नोंदवताना आपल्या मुलीला अल्पवयीन म्हटले आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३६३ आणि ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या प्रेमी युगुलाने बरेली येथील मंदिरात लग्न केले.

लग्नासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात फरजानाने स्वत:ला प्रौढ असल्याचे सांगितले आहे. फरजानाने तिचे वय २३ वर्षे असल्याचे सांगून तिचे आधार कार्डही दाखवले. आधार कार्डनुसार फरजानाचे जन्म वर्ष २००० आहे. फरजानाने ३२ वर्षीय वीरेंद्रसोबत केलेल्या लग्नाचे वर्णन कोणत्याही प्रकारच्या दबाव आणि लालसेपासून मुक्त असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या लग्नाला हिंदू संघटनांचे लोक उपस्थित होते, ज्यांना फरझानाने आतापासून स्वत:ला सरस्वती म्हणवून घेण्याचे आवाहन केले. नंतर फरजानाने स्वतःला आणि तिच्या पतीच्या सुरक्षेची मागणी करणारा व्हिडिओ देखील जारी केला.