मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर ३ मिनिटांसाठी थांबवण्यात आली. यामुळे मनसैनिकांनी आक्रमक होत टोलनाका फोडला. त्यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांसमोर आक्रमक पवित्रा घेतना मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. तिथे माध्यामांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करतोय,त्यामुळे तो काही महाराष्ट्रभर टोल फोडतोय असे नाही. रस्त्यांवर खड्डे , वाहतुक कोंडी आहे मग कसली टोल वसुली केली जातेय?, असा सवाल ही ठाकरेंनी केला.
दरम्यान रामायण १२ वर्ष घडलं मात्र वांद्र सी लिंकसाठी १० वर्ष लागली. तसेच टोलचे पैसे नक्की कुणाला मिळतात? , असा टोला ही ठाकरेंनी लगावला. त्याचबरोबर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांने उद्धटपणा केला म्हणून लोकांचा संताप झाला. त्यामुळेच टोल चालवणारे कोण आहेत.यांचा आधी शोध घ्यावा. आणि अमित ठाकरे राजरकारणात आहेत त्यामुळे टीका होणारचं , असे ही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान अजित पवारांच्या बंडावर बोलताना ठाकरे म्हणाले की, सत्तेत पवारांची पहिली टीम सामील, दुसरीही लवकरच होईल .सध्या आम्हीच विरोधी पक्ष आहोत, बाकीच्या पक्षांच काय कळत नाही, अशी खोचक टीका ही ठाकरेंनी केली. त्याआधी दि. २५ जुलै रोजी मनसैनिकांनी आक्रमक होत टोलनाका फोडला. यावर भाजपाने ट्विट करत निशाणा साधला होता. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा. असं म्हणत भाजपाकडुन व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.