मुंबई : खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा एक भाग आज दि. २६ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी ठाकरेंनी सरकारवर टीका केली. ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर आता भाजपाकडुन पलटवार केला जात आहे. यातच, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी ट्विट करत ठाकरेंच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये ट्विटमध्ये म्हणाले, "तेच ते… तेच ते…माकडछाप दंतमंजन, तोच ‘जोडा’ तेच रंजन, तीच ‘रडगाणी’ तेच तराणे, ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत…तेच ते… तेच ते." असे म्हटले आहे.