"सुषमा अंधारे तुमच्या डोळ्यावर तेव्हा अंधारी आली होती का?"
ज्योती वाघमारेंनी झाप झाप झापलं
25-Jul-2023
Total Views |
मुंबई : इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी चालत पोहोचले होते. संपूर्ण घटनेचा आढावा त्यांनी घेतला. मृतांच्या कुटुंबाना मदत जाहीर केली. यावरुन सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला ज्योती वाघमारे यांनी प्रत्त्युत्तर केले आहे. भर पावसात राज्याचे मुख्यमंत्री २ तास चालत घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा सुषमा अंधारे तुमच्या डोळ्यावर तेव्हा अंधारी आली होती का? असा संतप्त सवाल वाघमारेंनी केला आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, "कोविडच्या संकटात उंदीर जसा बिळात लपून राहतो, तसं घरात बसुन कारभार चालवणारे आमचे मुख्यमंत्री नाहीत. कितीही मोठं संकट असलं तरीही संकटाच्या छाताडावरती पाय ठेवून लढणारे आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे घरी बसणारे घरकोंबडे अनेक पाहिले. पण, एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनात राहणारे मुख्यमंत्री आहेत. जसं औरंग्याच्या सैनिकांना पाणी पिताना सुद्धा पाण्यात संताजी, धनाजी दिसत होते, तसंच आपल्या कार्यकतृत्वामुळे स्वप्नातसुद्धा एकनाथ शिंदे दिसत आहेत." असं ठाकरेंना उद्देश्युन वाघमारेंनी टोला लगावला आहे.