पुणे : महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि आजाराचे वेळेच निदान होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत भाजप वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. तेजस्विनी गोळे यांनी व्यक्त केले. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्याच्या निगडित असलेल्या ‘आयुष्मान भारत योजना’, ‘महात्मा फुले योजना’ व ‘मुख्यमंत्री साहाय्यक निधी’ आदी योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मानिधी महिला संघटना आणि भाजपच्यावतीने ‘सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा आणि भाजपच्या डॉ. तेजस्विनी गोळे यांनी महिलांसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. उंड्री येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात अनेक शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांच्या कोलेस्ट्रोल, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन आदी तपासण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.