विषारी सकारात्मकतेवर विचारी उपाय

    24-Jul-2023
Total Views | 79
Article On Thoughtful solutions to toxic positivity

सकारात्मकता ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा सकारात्मकतेची स्वतःवर सक्ती केली जाते, जेव्हा ती नकारात्मक भावनांवर मुखवटा घालण्यासाठी वापरली जाते आणि जेव्हा ती समस्यांना सामोरे जाणे टाळण्यासाठी वापरली जाते, तेव्हा ती विखारी बनते. मी तसे पाहिले, तर खूप, खूप आनंदी आहे. पण मला आणखी खूप, खूप, खूप आनंदी व्हायचे आहे आणि म्हणूनच मी आज दुःखी आहे.’ ज्या लोकांना आनंदी राहण्याची अपेक्षा असते, त्यांच्या नकारात्मक भावनिक अवस्थांना ते जीवनातील अपयशाचे लक्षण मानतात.

या नकोश्या भावनिक अनुभवांना ते स्वीकारत नाहीत. नकारात्मक भावनांशी असलेली त्यांची ही अस्वस्थता स्पष्ट करते की, मानसिक स्वास्थ्याची भावना त्यांच्यात कमी का होते. जेव्हा लोकांना असे वाटते की, त्यांचे जीवन सार्थक करण्यासाठी किंवा इतरांद्वारे महत्त्वाचे ठरण्यासाठी त्यांना उच्च पातळीची सकारात्मकता किंवा आनंद जोपासण्याची गरज आहे, तेव्हा ते त्यांच्या नकारात्मक भावनांवर वाईट प्रतिक्रिया देतात. ते या भावनांशी संघर्ष करत राहतात किंवा दुःखी भावनासुद्धा जीवनाचा एक सामान्य भाग असू शकतो, हे ते मानायला तयार नसतात.

सकारात्मकता ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा सकारात्मकतेची स्वतःवर सक्ती केली जाते, जेव्हा ती नकारात्मक भावनांवर मुखवटा घालण्यासाठी वापरली जाते आणि जेव्हा ती समस्यांना सामोरे जाणे टाळण्यासाठी वापरली जाते, तेव्हा ती विखारी बनते. आपण आता अशा संस्कृतीत राहतो, जिथे अनेकजण त्यांच्या आयुष्याची एक ऑनलाईन निखालस प्रतिमा तयार करण्यासाठी जास्त वेळ काम करतात. नातेसंबंध, सुट्ट्या, कामाची उपलब्धी, पिकनिक आणि बरेच काही वैयक्तिक, सोशल मीडियावर टाकून लोक आपले जीवन सार्वजनिक करू लागले आहेत. अर्थात, काही चांगले क्षण सार्वजनिक करण्यात काहीही चुकीचे नसले तरी, जेव्हा आपण एखाद्याचे आयुष्य सर्वोत्तम पाहतो, तेव्हा ते आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल एक अवास्तव आणि आदर्श दृष्टिकोन देऊ शकते आणि ते हानिकारक ठरु शकते.

विखारी सकारात्मकतेशी संबंधित काही विशेष सामान्य गोष्टी आहेत. त्यापैकी काही वैयक्तिक नकारात्मक भावना आणि विचार लपवणे, वाईट मूड असलेल्या किंवा त्यांच्या समस्या शेअर केलेल्या लोकांमुळे चिडचिड होणे, इतरांना त्यांनी कमकुवतपणा आणि असुरक्षा दाखवल्यामुळे त्यांना हीन लेखणे, नकारात्मक भावना अनुभवल्याबद्दल स्वतःलादोष देणे या आहेत. सुदैवाने विषारी सकारात्मकतेला सामोरे जाण्याचे व टाळण्याचे अनेक मार्ग आहेत.

१. आपल्या विचार आणि भावना अनुभवा

बरेच लोक आपल्या भावना दुर्लक्षित करण्यात आणि दडपण्यात बरीच वर्षे घालवत आहेत. पण, त्या भावनांचा अनुभव स्वतःला समजून घेण्यास उपयुक्त आहे. आपल्या भावना आपल्यापैकी प्रत्येकाला उपयुक्त आहेत. अद्वितीय बनवण्याचा भाग आहेत. कोणत्याही भावना चुकीच्या किंवा बरोबर नसतात. एखाद्या वेळेस जर तुम्ही आव्हानात्मक काळातून जात असाल, तर तुमच्या भावनांमध्ये ‘ट्यून’ करा.

२. आपल्या अस्वस्थ असणार्‍या भावनेबरोबर आरामात राहावयाचा प्रयत्न करा

विषारी सकारात्मकतेवर मात करण्यासाठी धैर्य आवश्यक आहे. आपल्याला आपल्या सुखासीन ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर जावे लागेल याची सवय करा. जर तुम्हाला एखादी वाईट बातमी मिळाली, तर सर्व काही ठीक होणार नाही हे सत्य मान्य करणे खरोखरच विचित्र वाटू शकते. पण, कठीण ठिकाणी मुद्दाम स्थिरावण्याचे आणि एखादी कठीण परिस्थिती सामान्य होईपर्यंत इतरांसोबत त्यांच्या कठीण प्रसंगात साथ द्यावयाचे धैर्य ठेवा. स्वतःला थोडे अस्वस्थ होऊ द्या.

३. सामान्यपणे तोंडी येणारी विषारी सकारात्मक वाक्ये टाळा

जेव्हा अवघड संभाषणांचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही वापरत असलेल्या भाषेची जाणीव तुम्हाला असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर एखादी मैत्रीण तुमच्याकडे वाईट बातमी घेऊन आली, तर तिला फक्त ‘आनंदी राहा, झाले गेले ते विसरून जा,’ असा आग्रह करण्याऐवजी असे काहीतरी सांगून पाहा, ‘असे वाटणे कधीही मजेदार नसते. पण तुला यातूनही आनंद वाटेल असे काही आज आपण करू शकतो का? जर अवघड परिस्थितीत तुम्ही स्वतःला फक्त सकारात्मक व्हा,’ असे सांगण्याऐवजी ‘तुम्हाला सतवणार्‍या एखाद्या गोष्टीबद्दल अंतर्गत संवाद करत असल्यास स्वतःलासांगा, मला माहीत आहे की आपल्या आयुष्यात बरेच काही चुकीचे घडू शकते. अशावेळी काही बरोबर करता येणे शक्य आहे का?’

४. जीवनात हवा असणारा बदल एका रात्रीत होणार नाही, हे स्वीकारा.

विषारी सकारात्मकतेशी लढा देणे हे इतर हानिकारक वर्तन टाळण्यासारखे आहे; यास वेळ लागतो आणि ते लगेच होत नाही. जरी आपण सर्व काही आपल्याला हवे तसे ठीक होणार नाही, या कल्पनेला स्वीकारण्याचे ठरविले तरी, वेळोवेळी ते विसरणे पूर्णपणे सामान्य आहे. विचारातील हा बदल आहे जो एका रात्रीत होणार नाही. परंतु, दीर्घकाळात विषारी सकारात्मकतेपासून दूर जाणे आणि प्रामाणिकपणा निवडणे म्हणजे संपूर्ण जीवनाच्या परिपूर्ण मार्गाकडे एक धाडसी पाऊल जाणीवपूर्वक उचलण्यासारखे आहे.
५. स्वतःला पुरेसा वेळ आणि जागा द्या

काही किचकट गोष्टीवर काळच मात करतो, ते खरेच आहे. परंतु, आव्हानात्मक काळात स्वतःला वेळ आणि योग्य जागा देण्याची सवय आपण सगळ्यांनीच लावून घ्यायला हवी. जेव्हा माझे अत्यंत लाडके मांजर मरण पावले, तेव्हा मी एका आठवड्याची सुट्टी घेतली. मला लोकांपासून दूर जागा हवी होती. मी खूप भारावून गेले होते आणि कामाच्या ठिकाणी तणाव हाताळू शकले नसते. मला त्यावेळी ऊर्जा भासत नव्हती. आव्हानात्मक काळात स्वतःला वेळ आणि स्थान देण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे.

डॉ. शुभांगी पारकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121