कल्याण : आशिया खंडातील सर्वात पहिला हत्तीच्या रूपातील रोबोट (अॅनिमेट्रॉनिक) पाहण्याची संधी कल्याणकरांना मिळणार आहे. कल्याणमधील केंब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता केंब्रिया स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एली नामक हत्तीला पाहता आणि त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. हा कार्यक्रम दोन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी आहे असणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राणांबाबत आस्था आणि प्रेमाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने एली ची निर्मित्ती करण्यात आली आहे. या एलीची रचना आणि त्यांच्या हालचाली ख:याखु:या हत्तीसारख्या आहेत. विशेष म्हणजे हा बोलणारा आणि समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणारा हत्ती असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शैक्षणिक जनजागृतीसाठी बनवण्यात आलेला हा आशिया खंडातील हा सर्वात पहिला रोबोट असल्याची माहिती केंब्रिया शाळेचे प्रमुख आणि सुप्रसिध्द शिक्षण अभ्यासक बिपीन पोटे यांनी दिली.