मुंबई : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये बाजारपेठा रस्ते, घरं पाण्याखाली गेली आहेत. मुंबईसह कोकण, पुण्यात धो-धो पाऊस कोसळतोय. त्यामुळे काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट लागू केला आहे. तिथल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असून अनेक गावांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे.