खलील मियाँने दुर्गामातेच्या मंदिरातील मूर्त्यांची केली तोडफोड, दिला 'अल्लाहू अकबर'चा नारा!
22-Jul-2023
Total Views |
नवी दिल्ली : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. आता ब्राह्मणबारिया जिल्ह्यात खलील मियाँ नावाच्या व्यक्तिने दुर्गा मंदिरात घुसून तोडफोड केली. त्यामुळे मंदिरातील मूर्तींची मोडतोड झाली. मूर्ती तोडताना खलील मियाँ 'अल्लाहू अकबर'चा नारा देत होता. दरम्यान, स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना दि.२० जुलै रोजी घडली.
ही घटना ब्राह्मणबारिया जिल्ह्यातील सरायल उपजिल्ह्यातील नियामतपूर गावात घडली. हे प्रकरण दि. २० जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका तरुणाने मंदिरात घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हल्ल्यानंतर मंदिरातील अनेक मूर्तींची मोडतोड झाली. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये दुर्गामातेच्या मूर्ती खंडित अवस्थेत दिसत आहे. स्थानिकांचा दावा आहे की आरोपी खलील मियाँ मंदिरातील मूर्ती तोडताना अल्लाहू अकबरच्या घोषणा देत होता.
मंदिराची तोडफोड केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी ब्राह्मणबारिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद शाखावत हुसैन यांनी सांगितले की, मंदिराची तोडफोड करणाऱ्या खलील मियाँ याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी मंदिरावर हल्ला का केला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
या प्रकरणातील आरोपी तरुणांवर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, आरोपी खलील मियाँ हा बहिणीला भेटण्यासाठी नियामतपूर गावात आला होता. यादरम्यान स्थानिक लोकांशी त्यांची हाणामारी झाली. या कारणास्तव त्याने मंदिरात बसवलेल्या ५-६ मूर्ती तोडल्या.
या प्रकरणी नियामतपूर सार्वजनिक दुर्गा मंदिराचे अध्यक्ष जगदीश दास यांनी आरोपी खलील मियाँविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि स्पीडी ट्रायल कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. जगदीश दास सांगतात की, मंदिरातील या घटनेमुळे हिंदू खूप संतापले आहेत. समाजात असंतोषाची भावना वाढत आहे.