रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लोकल थांबल्यास पाहणी होणार
21-Jul-2023
Total Views |
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे लोकलसेवा पूर्ण खोळंबली होती. अंबरनाथ, बदलापूर येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अशातच, नागरिकांनी घरी लवकर पोहोचण्यासाठी जीवघेणा प्रवास केला. सहा महिन्यांची ऋषिकाच्या घटनेनंतर रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
१५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लोकल एकाच जागी थांबल्यास त्या लोकलची पाहणी होणार आहे. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ या लोकलची पाहणी करतील. यावेळी या लोकलमध्ये अडकलेल्या रुग्ण, लहान मुलं, गरोदर महिला, वयस्कर यांना मदत पोहोचवली जाईल. ज्यामुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास टळेल.
याशिवाय AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याचे नियम आणि वेळा देखील बदलल्या आहेत. याआधी प्रवाशांना एसी कोच आणि स्लीपरमधून प्रवास करताना रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपण्याचा परवानगी होती. पण आता रेल्वेने या नियमात बदल केला आहे. रेल्वेच्या बदललेल्या नियमानुसार, आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपू शकता. म्हणजेच झोपण्याची वेळ आता कमी करुन 8 तास करण्यात आली आहे. ज्या ट्रेन्समध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, तिथेच हा नियम लागू होणार आहे.