इर्शाळवाडी दुर्घटना : ३६ तासानंतर ही महिला ढिगाऱ्याखाली जिवंत

    21-Jul-2023
Total Views |
 
Irshalwadi accident
 
 
मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०३ लोकांना वाचवण्यात पथकाला यश आलं आहे. अजून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातच, बचाव पथकाने एका महिलेला तब्बल 36 तासानंतर जिवंत काढल्याची माहिती मिळते आहे. ही महिला ढिगाऱ्याच्या खाली अडकली असून तिला वाचविण्यात यश आले आहे. तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
 
ईर्शाळगड दुर्घटनेत विस्थापित झालेल्या नागरिकांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसेच, राज्य शासन या दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत शासनाकडून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चादेखील केली. तसेच, चॉपर्सची मागणीही करण्यात आली, परंतु खराब हवामानामुळे याची मदत घेता आली नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच, यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.