अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री!

    02-Jul-2023
Total Views |
Ajit Pawar to take oath as deputy CM of Maharashtra

मुंबई
: विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ दि. २ जुलै रोजी अजित पवारांनी घेतलेली आहे. तसेच दरम्यान छगन भुजबळ , हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे , वळसे पाटील , धर्मराव आत्राम , संजय बनसोडे , अनिल पाटील ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे ३० ते ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारमध्ये राष्ट्रवादीचे ९ जण मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये छगन भुजबळ आता सरकारमध्ये सामील होणार आहेत. दरम्यान प्रफुल्ल पटेल राजभवनावर दाखल झालेले आहेत. त्यामुळे शिवसेने सारखीच राष्ट्रवादीत ही उभी फुट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.