बोगस बियाण्याच्या संदर्भात कायदा कडक करणार : देवेंद्र फडणवीस
17-Jul-2023
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून म्हणजेच सोमवारपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरकार शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत गंभीर आहे. त्यामुळे सरकारलाही शेतकऱ्यांची काळजी आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासाठी एक समिती गठित करण्यात आलेली आहे. त्यामुळे बोगस बियाण्याच्या संदर्भात कायदा कडक करणार असल्यांचे ही फडणवीसांनी सांगितले. म्हणून विरोधी पक्षालाच चिंता आहे आणि सत्ताधारी पक्षाला शेतकऱ्यांची चिंता नाही असं म्हणणे चुकीचे आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान केले.