तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांना 'ईडी'कडून अटक

न्यायालयीन कोठडी कायदेशीर असल्याचे मद्रास कोर्टाकडून स्पष्ट

    15-Jul-2023
Total Views |
Tamil Nadu Stalin Government Minister Senthil Balaji Arrested By ED
 
मुंबई : तामिळनाडू सरकारमधील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना ईडीने पुन्हा एकदा अटक केली असून याआधी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, तामिळनाडू स्टालिन सरकारमधील महत्त्वाचे मंत्री म्हणून सेंथिल बालाजी ओळखले जातात. व्ही. सेंथिल बालाजी यांना राज्याच्या परिवहन विभागात झालेल्या नोकऱ्यांसाठीच्या रोख घोटाळ्याप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात अटक केली होती.
 
दरम्यान, तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने केलेली अटक आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने दिलेली न्यायालयीन कोठडी मद्रास उच्च न्यायालयाने दि. १४ जुलै रोजी कायदेशीर ठरवली. दरम्यान, मद्रास कोर्ट न्यायमूर्ती सी. व्ही. कार्तिकेयन यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना मंत्र्यांच्या अटकेशी संबंधित एका याचिकेवर विभागीय खंडपीठाने विभाजित निर्णय दिल्यानंतर मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवली आहे.
 
दरम्यान, मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती निशा बानू आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सेंथिल बालाजी यांची पत्नी मेगला यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर विभाजित निर्णय यावेळी दिला आहे.