UCC
लखनऊ: मुस्लिम संघटना देशात समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध करत आहेत. समान नागरी कायद्याचा विरोध करण्यासाठी या संघटना आता तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये मशिदीबाहेर बार कोड लावण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईतही करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जमियत उलेमा-ए-हिंदच्या कार्यकर्त्यांनी मशिदीबाहेर क्यूआर कोड लावले आहेत. नमाज अदा करण्यासाठी मशिदीत येणारे मुस्लिम क्यूआर कोड स्कॅन करून समान नागरी कायद्याच्या विरोधात आपला निषेध नोंदवू शकतात. यूसीसी शरियतच्या विरोधात असल्याचे जमियतने म्हटले आहे.
समान नागरी कायद्याला केवळ जमियत उलेमा-ए-हिंदच विरोध करत नाही, तर बहुतांश इस्लामिक संघटनाही याच्या विरोधात आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) या मुस्लिमांच्या संघटनेने 'देशात यूसीसी लागू होऊ देणार नाहीत' अशी धमकीही दिली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी लखनऊ आणि मुंबईमध्ये समान नागरी कायद्याच्या विरोधात मशिदीबाहेर बारकोड लावण्यात आले होते. मुंबई शहरातील पठाणवाडी, मालाड परिसरात असलेल्या नूरानी मशीदमध्ये समान नागरी कायद्याचा विरोध नोंदवण्यासाठी क्यूआर कोड लावले होते.