नवी दिल्ली : बॅस्टिल डे परेडच्या आधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तिचे कापलेले बोट पोस्टद्वारे पाठवले गेले. हे पार्सल दि. १० जुलै रोजी पॅरिसमधील एलिसी पॅलेस (राष्ट्रपती भवन) येथे पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये दंगली होत आहे.
दरम्यान जेव्हा हे कापलेले बोट असलेले पार्सल पोलीसांना सापडले .तेव्हा पोलीसांनी ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जेणेकरून ते खराब होऊ नये.कारण त्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत. मात्र या कापलेल्या बोटासह कोणतेही धमकीचे पत्र पाठण्यात आलेले नाही. तसेच राष्ट्रपतींकडे बोट का पाठवण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलीसांनी केलेल्या तपास असे लक्षात आले की, हे बोट एका जिवंत माणसाचे आहे. यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याच्याशी संपर्क साधून त्याला संपूर्ण वैद्यकीय मदत देण्यात आली. तथापि, वैद्यकीय गोपनीयता कायद्यानुसार त्या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही.
फ्रान्स पोलीस आपत्तीग्रस्तांना ओळखण्यासाठी एकीकृत बायोमेट्रिक्स फिंगरप्रिंट स्कॅनर वापरतात. यासाठी आपत्तीग्रस्त ओळख पथक आहे. याशिवाय, बेवारस मृतदेह ओळखण्यासाठी पोलिस स्कॅनरचा वापर करतात.यापूर्वी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना धमकावण्यासाठीही गोळ्या पाठवण्यात आल्या आहेत. मात्र कापलेले मानवी अवयव पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच हा सर्व प्रकार फ्रान्समध्ये तेव्हा घडला जेव्हा नाहेल एम नावाच्या स्थलांतरित कुटुंबातील १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर देशभरात दंगली उसळल्या.