फ्रान्स राष्ट्राध्यक्षांना मोदींनी दिलं अनोखं गिफ्ट! - वाचा सविस्तर
15-Jul-2023
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच १३ जुलै रोजी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना एक अनोखी भेट दिली आहे. मॅक्रॉन यांना संगीताची प्रचंड आवड आहे. तसेच ते हौशी पियानोवादक आहेत. त्यामुळे हीच गोष्ट लक्षात आल्यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय संस्कृती आणि कलेचे प्रतीक असलेली चंदनापासून तयार केलेली सितार या संगीत वाद्याची प्रतिकृती भेट मॅक्रॉन यांना दिली.
या सितारच्या प्रतिकृतीवर माता सरस्वती आणि श्रीगणेशाच्या प्रतिमा विराजमान असून सुंदर, बारीक नक्षीकाम करण्यात आलं आहे. तसेच भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराच्या प्रतिमा ही जडवण्यात आल्या आहेत. ही प्रतिकृती म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि हजारो वर्षांचा वारसा लाभलेल्या भारतीय कलावैभवाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
तसेच मॅक्रॉन यांच्या पत्नीला चंदनाच्या पेटीतून पोचमपल्ली सिल्क साडी भेट ही पंतप्रधानानी दिली. ही साडी भारतातील तेलंगणातील पोचमपल्ली ह्या शहरातील खास सिल्क पासून तयार केलेली आहे. पोचमपल्ली रेशीम इकत फॅब्रिक हे भारताच्या वैभवशाली वस्त्रोद्योग वारशाचा पुरावा असल्याचं सांगितलं जातं. इकत रेशीम फॅब्रिक सजावटीच्या चंदनाच्या बॉक्समधून देण्यात आलं.
त्याचबरोबर फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांना पंतप्रधान मोदींनी हाताने कोरलेला चंदनाचा अंबावारी हत्ती भेट दिला. शुद्ध चंदनापासून बनवलेल्या, उत्कृष्ट हत्तीच्या मूर्ती कृपा आणि वैभव प्रकट करतात.
दरम्यान पंतप्रधानांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष याल ब्रॉन-पिवेट यांना हाताने विणलेला रेशमी काश्मिरी गालिचा भेट दिला.