मुंबई : राज्य सरकारच्या "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत राज्यातील नागरिकांना घरपोच रेशन मिळणार असून याची सुरुवात ठाणे आणि मुंबई या शहरातून करण्यात येणार आहे. "शासन आपल्या दारी" या उपक्रमाच्या धर्तीवर आता रेशन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून तशा पध्दतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, रेशन आपल्या दारी अंतर्गत सर्वप्रथम रेशन मुंबई, ठाणे या शहरात घरपोच वितरित केले जाणार आहे. तसेच, या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा शिधावाटप हे लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हा आहे. फडणवीस-शिंदे सरकारने शासन आपल्या दारी या उपक्रमाद्वारे राज्यात नवनवीन योजनांचा शुभारंभ केला असून त्यातच आता रेशन आपल्या दारी या उपक्रमाचा समावेश झाला आहे.