चांद्रयान ३ : इस्त्रोच्या टीमचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतूक! म्हणाले, "या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल"
14-Jul-2023
Total Views |
मुंबई : “चांद्रयान-३ या इस्त्रोच्या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, चांद्रयान-३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, इस्त्रोने चांद्रयान-३ प्रक्षेपित करत बजावलेल्या कामगिरीबद्दल संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, चांद्रयान-३ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक असून आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातदेखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले. तसेच, चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी असून यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेकरिता इस्त्रोला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.