सप्तशृंगी गड घाटात १८ प्रवाश्यांसह बस ४०० फुट दरीत कोसळली!

    12-Jul-2023
Total Views |
Nashik Accident News

मुंबई : नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघाच झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू ही झाला आहे. ह्या अपघात होण्याआधी बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. जवळजवळ ४०० फूट दरीत बस कोसळली. दरम्यान या अपघाताची माहिची मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. दि. १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजून ५० मिनटांनी हा अपघात झाल्याचे संबधितांकडून सांगितले जात आहे. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान ४०० फुट दरीत बस कोसळल्याने हा मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे.

तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघाचस्थळी भेट देऊन संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही, असे ही भुसे म्हणाले.