भाजपची भिवंडीत मॅरेथॉन बैठक!

    12-Jul-2023
Total Views |

BJP Marathon meeting 
 
 
मुंबई : महाराष्ट्र भाजपची उद्या दि. १३ जुलै रोजी भिवंडीत मॅरेथॉन बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या सर्व आमदार-खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
 
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या दिवसभर भाजपच्या खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार असून त्या पार्श्वभूमीवर बैठकीत रणनिती निश्चित करण्यात येणार आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षांचा कामाची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आखलेल्या 'मोदी@९' अभियानाचा आढावा देखील या बैठकीत घेतला जाणार आहे.