कलंकतेची कावीळ झालेले उद्धव ठाकरे : मुंबई भाजपची टीका

    11-Jul-2023
Total Views | 121

Thackeray 
 
 
मुंबई : नागपुर सभेत बोलत असताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका त्यांची जीभ घसरली. 'कलंक' शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे, आमदार राम कदम आणि इतर नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरेंवर हल्लाबोल केला. यातच आता मुंबई भाजपच्या ट्विटर हँडलवरुन कलंकतेची कावीळ झालेले उद्धव ठाकरे असं म्हणत व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत टिपु औरंग्याचा उदो उदो, तुष्टीकरण, भ्रष्टाचार, सुडाचे राजकारण, वसुली-खंडणी, सोनिया चरणी लोटांगण, जनादेशाचा अपमान, हिंदुत्त्वाला धोका अशी विशेषणं वापरुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121