‘बोरिवली विचार मंचा’तर्फे शालेय साहित्य वितरण आणि मदत

    11-Jul-2023
Total Views |
Article On Borivali Vichar Manch

मुंबई
: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणे, हे राष्ट्रीय कार्य असल्याचे विचार ‘बोरिवली विचार मंच’च्या कार्यकर्त्यांनी मांडलेे. नुकतेच ’बोरिवली विचार मंच’तर्फे सुविद्या प्रसारक संघ विद्यालय, बोरिवली (पश्चिम) परांजपे नगर, वझीरा नाका, येथील ४१ गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी बॅग्स, कंपास आणि वह्या देण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.

हा उपक्रम अतिशय वेगळा होता. या उपक्रमाअंतर्गत, ४१ गरजू विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शालेय शुल्क भरण्यात आले. या उपक्रमात समाजातील विविध स्तरातील आणि व्यवसायातील मान्यवरांनी मदत केली. ‘बिग बॉस’ विजेता कलाकार विशाल निकम यांनी सिंहाचा वाटा उचलला. या विद्यार्थ्यांचे पालक रोजच्या आयुष्यात संघर्ष करून आपला प्रपंच चालवतात. काही मूलं तर सुट्टी पडली अभ्यास न करता कामाला जातात. अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला अनेक लोकं पुढे आली. या लोकांच्या कृतीमधून माणुसकी आणि आपलेपणाची भावना जीवंत असल्याची पावती मिळाली. ‘सुविद्या प्रसारक संघ’ शाळेचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यवाह मिलिंद जोशी आणि सहकार्यवाह देवयानी सबनीस यांची मोलाची साथ लाभली.

शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप तांबे यांनी स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून हे कार्य तडीस नेण्यास हातभार लावला. संघटनात्मक प्रयत्नांनी ‘बोरिवली विचार मंच’च्या या उपक्रमाला अगदी थोड्या अवधीत यश दिले. त्याबद्दल शाळेतील शिक्षक वर्गांनी देणगीदारांचे शतश: आभार मानले. मातृभाषेत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे जरी खरे असले तरी त्यासाठी गरज असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याचे कार्य हाती घ्यायला हवे. ही मूलं आणि मुली शिक्षणा अभावी चुकीच्या मार्गावर जायची शक्यता असते.या राष्ट्रकार्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘बोरिवली विचार मंच’तर्फे करण्यात आले. या कार्यामध्ये सहकार्य करणार्‍यांनी कृपयापराग कुलकर्णी ९३७२४३२१९१,निखिल भक्ता ८८२८१३४०६० यांच्याशी संपर्क साधावा, असेही मंचाने आवाहन यावेळी केले.