मुंबई : ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणारी गणेश कलंदाते नामक व्यक्तीने जंगली रमीमध्ये ऑनलाईन २० हजार रुपये गुंतवले होते, त्यात त्याला नुकसान सहन करावे लागल्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गणेश कलंदाते हा एक कॅब चालक असून त्याला मद्यपानाचे व्यसन होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गणेश कलंदाते या व्यक्तीने नुकसान भरून काढण्याच्या हताश प्रयत्नात, त्याने आणखी पैसे गुंतवले होते, परंतु सर्व पैसे गमावल्याने त्याला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केले, असे पोलिसांनी सांगितले. सध्या ऑनलाइन गेमिंगमुळे आणि फसवणुकीच्या प्रकारांमुळे अनेकजण टोकाचे पाऊल उचलत आहेत.