मोहम्मद अजीमने सहकाऱ्यांसह मंदिरासमोर कापून टाकले म्हशीचे शीर!

    01-Jul-2023
Total Views |
Head of buffalo found near temple in Delhi

नवी दिल्ली : बकरी ईदनंतर एका मंदिरासमोर म्हशीचे छिन्नविछिन्न मुंडके सापडल्याने दिल्लीतील शाहदरा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीसह दोन लोक स्कूटीवर येताना आणि कापलेले डोके फेकताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अजीम आणि १६ वर्षीय मुलाला अटक केली आहे.

दि. ३० जून रोजी दिल्लीच्या वेलकम भागात एका मंदिराबाहेर म्हशीचे छिन्नविछिन्न मुंडके सापडले.दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अजीम आणि दिल्लीतील बाबरपूर येथील अल्पवयीन मुलाल अटक केलेली आहे. तसेच तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.



 
ईशान्य दिल्लीचे डीसीपी जॉय तिर्की यांनी सांगितले की, शुक्रवारी दि. ३० जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एका व्यक्तिने कॉल करत वेलकम पोलिस स्टेशनला कळवले की पश्चिम गोरखपार्कमधील नाला रोड येथील मंदिराबाहेर एका म्हशीचे कापलेले डोके पडले आहे. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मंदिरासमोरून पडलेले शीर ताब्यात घेतले.

पोलिसांनी कलम 153A (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 295A (जाणूनबुजून कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने आणि द्वेषपूर्ण कृत्य करणे) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ).



या घटनेबद्दल परिसरातच नाही तर सोशल मीडियावरही लोक संतापले आहेत. पत्रकार स्वाती गोयल शर्मा म्हणाल्या की, दिल्लीतील या घटनेची माहिती नसलेल्या लोकांनी बकरी ईदपूर्वी हाउसिंग सोसायटीत आणलेल्या बकऱ्यामुळे मीरारोड येथील घटना समजून घ्यावी.




त्या पुढे म्हणाले, “बकरी ईदच्या एका दिवसानंतर, मोहम्मद अजीम आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने एका स्कूटरवर कापलेली म्हैस आणली आणि त्याचे डोके मंदिराबाहेर फेकले. जरी बरेच लोक मांस खातात, परंतु कत्तल केलेल्या प्राण्यांचे दृश्य बहुतेक हिंदूंसाठी घृणास्पद आहे. मारल्या गेलेल्या प्राण्याला त्यांच्या परिसराच्या बाहेर आणि विशेषतः मंदिराबाहेर फेकणे म्हणजे भावनांची जाणीवपूर्वक चेष्टा करणे आहे.”, असे ही शर्मा म्हणाल्या.