मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलीसांना यासंबंधी योग्य तपास करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता स्वतः शरद पवारांनी यावर भाष्य केले. मला धमक्या देऊन माझा आवाज बंद करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. ते म्हणाले, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारची असून पवारांनी याकडे लक्ष वेधले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दि. ९ जून रोजी ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सरकारने यात तातडीने लक्ष घालून पवारांच्या घराबाहेरच्या सुऱक्षेत वाढ केली. त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनादेखील फोनवरून शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे.