मुंबई : मीरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकाराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या केली आहे. हत्येनंतर तिच्या शरीराचे कटरने लहान लहान तुकडे करायचा आणि ते तुकडे शिजवून कुत्र्याला खाऊ घालायचा किंवा गटारात फेकून द्यायचा , असे पोलीसांनी सांगितले आहे. पोलीसांनी मनोज साहानी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सरस्वती वैद्य असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ते दोघेही ३ वर्षापासून सोबत राहत होते. या घटनेमुळे दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. श्रद्धा हत्याकांडात आफताबने आपल्या प्रेयसीचे ३० हून अधिक तुकडे करून जंगलात फेकले होते.
पोलिसांच्या मते, हे हत्याकांड ३ -४ दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता आहे. सध्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत. मनोज व सरस्वतीचे कोणत्या तरी मुद्यावरून भांडण झाले होते. याचं भांडणामुळे रागाच्या भरात मनोजने सरस्वतीची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बाजारात जाऊन चेन सॉ अर्थात विद्युत करवत आणून प्रेयसीच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कुकरवर शिजवून मनोज ते तुकडे कुत्र्यानां खाऊ घालत असे. वढेच नाही तर काही तुकडे गॅसवर भाजून नंतर ते बादली व टबमध्ये ठेवल्याचेही आढळले. पोलिसांच्या मते, आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी व दुर्गंधी दूर करण्यासाठी हे कृत्य केले असावे.