'आदिपुरुष' चित्रपटासाठी थिएटरमध्ये एक सीट आरक्षित ठेवणार कारण...

    07-Jun-2023
Total Views |
one-seat-vacant-unsold-for-hanuman-adipurush-movie-screening-prabhas-says-will-marry-in-tirupati-trailer-launch

मुंबई : प्रभास, कृति सेनन आणि सैफ अली खान ही स्टारकास्ट असणारा आदिपुरूष हा सिनेमा १६ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात प्रभास भगवान श्री रामची भूमिका साकारत आहे, तर कृति सेनन माता सीतेच्या भूमिकेत तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यापुर्वी 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी हनुमानजींसाठी प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

'आदिपुरुष'च्या प्रमोशनचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येक थिएटरमध्ये 'आदिपुरुष'च्या स्क्रिनिंग दरम्यान, हनुमानजीसाठी एक जागा रिक्त ठेवली जाईल. लोकांची श्रद्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त हनुमानजी येतील आणि चित्रपट पाहतील. या विश्वासाने प्रत्येक थिएटरमध्ये एक जागा रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

'आदिपुरुष' हा चित्रपट तेलगू , तमिळ , हिंदी , मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे. दुसरीकडे , चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी प्रभासने सांगितले की, मी तिरुपतीमध्येच लग्न करणार आहे. आतापर्यत अनेक अभिनेत्रीसोबत प्रभासचे नाव जोडले गेले होते. त्यामुळेच प्रभासच्या लग्नाच्या चर्चाणा उधाण आले आहे. त्याचप्रमाणे 'आदिपुरुष'च्या दुसऱ्या ट्रेलरच्या लॉन्चिंगवेळी प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

प्रभास म्हणाला की, 'मी तिरूपतीमध्ये लग्न करणार आहे.” यादरम्यान त्याने गमतीने असेही सांगितले की, तो आता दरवर्षी २ चित्रपट करणार आणि गरज पडल्यास तिसरा चित्रपट देखील करणार असल्याचे प्रभास म्हणाला. तसेच भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी चित्रपटाच्या टीमसोबत तिरुमला तिरुपती मंदिरालाही भेट दिली.