मुंबई : एका विशिष्ट समाजातील लोक औरंगजेब व टिपू सुलतान यांचे उद्दातीकरण करत आहे. पण यामागे कोण आहे. याचा शोध घ्यावा लागेल. विशेष म्हणजे काही नेते बोलतात. त्यानंतरच विविध जिल्ह्यांमध्ये उद्दातीकरण केले जाते. यामागे नेमके कोण आहे, याच्या खोलात जावेच लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातील दंगली किंवा जातीतील तेढ निर्माण होण्यामागे राज्यातील सत्ताधारी जबाबदार आहेत, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, "औरंगजेबाचे उद्दातीकरण खपवून घेतले जाणार नाही, हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, औरंगजेब कोणाला जवळ वाटतो, हे सर्वांना माहित आहे, याची देखील चौकशी केली पाहिजे." असा इशारा देवेंद्र फडवीसांनी दिला.