Love Jihad : मोहम्मदनं बौद्ध धर्मीय असल्याचं सांगत केलं कॉन्स्टेबल महिलेचं धर्मांतरण! IPL क्रिकेटरनं केला बलात्कार!

    06-Jun-2023
Total Views |
love-jihad-with-woman-police-constable-uttar-pradesh-imran-khan-buddhist

लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. शिवकुटी पोलिस स्टेशनमधील एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने इमरान खानवर बौद्ध धर्म स्वीकारून फसव्या पद्धतीने लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेचे म्हणणे आहे की, लग्न झाल्यापासून इमरान आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहेत.
 
पीडितेने तिचा सासरा मुलतान, मेहुणा मोहसीन खान यांच्याविरुद्ध लैगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. मोहसीन खान हा क्रिकेटपटू असून तो यावेळी आयपीएलमध्ये 'लखनऊ सपूर जायंट्स'कडून खेळला आहे.पीडीत महिला पोलीस कॉन्स्टेबलचा पती हा देखील तिच्याच विभागात पोलीस हवालदार आहे.
 
पीडित महिला वाराणसीची रहिवासी आहे. तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारातून न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावनिक साद घातली आहे. पीडीतेने सांगितले की, “इमरान खान लग्नानंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. तसेच पीडीतेने सांगितले की तिला लग्नानंतर झायरा बानू हे नाव तिच्या पतीने दिले होते. दरम्यान त्याची पहिली पत्नी त्याच्यासोबत राहत होती. मात्र आता तिने पीडीतेला प्रतिज्ञापत्र पाठवले आहे. त्यानुसार तिने आरोपीसोबत घटस्फोट घेतला आहे. तसेच पी़डीतेने या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे तपासकर्त्यांना दिले आहेत. यानंतरही पोलीस ठाण्यात कोणीही पीडीतेच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणताही मार्ग शिल्लक नाही. मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करणार होते पण माझ्या मित्राने मला वाचवले , असे पीडीतेने सांगितले आहे.
 
पीडितेच्या तक्रारीवरून २३ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपी इमरानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, पीडितेचा आरोप आहे की तपासकर्ते या प्रकरणात आरोपीसोबत मिळालेले आहेत. त्यामुळे इमरान खानवर एससी/एसटी कलमे लावण्यात आलेली नाहीत.एवढेच नाही तर आरोपीच्या भाऊ आणि वडिलांची नावेही त्या लोकांनी काढून टाकली आहेत.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, २०१६ मध्ये ती प्रशिक्षणासाठी मुरादाबादला गेली होती.तिथेच तिची ओळख पोलिस कॉन्स्टेबल इमरानसोबत झाली. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. यानंतर,२०१८ मध्ये इमरान खानने बौद्ध धर्म स्विकारला आणि वारणसीमध्ये पीडीतेशी विवाह केला. मात्र लग्नानंतर पीडीतेवर इमरान धर्मातरांचा दबाब टाकू लागला. इमरान पीडीतेला म्हणाला की, जर तिला तिच्यासोबत राहायचे असेल तर त्याला मुस्लिम व्हावे लागेल.

पीडीत महिला म्हणाली की, “मला अडकवण्यासाठी त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. या कटात त्यांचे संपूर्ण कुटुंब सामील आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही तो प्रत्येक मशिदीत जाऊन नमाज अदा करू लागला. तसेच तो पीडीतेला अजमेर आणि बाराबंकीच्या मशिदीत घेऊन गेला. २०१९ मध्ये एका कार्यक्रमासाठी इमरानच्या घरी एका कार्यक्रमाला गेले असता तिथे त्यांचा भाऊ मोहसिनने पीडीतेवर बलात्कार केला. पीडितेला तीन वर्षांचा मुलगाही आहे. इमरानने मुलांचा सुंता करण्याचा देखील प्रयत्न केला. पण पीडीतेने मात्र त्याला हे करण्यास विरोध केला. दरम्यान पीडीतेने त्यांच्या कुटुंबीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी एसीपी शिवकुटी राजेश यादव यांनी सांगितले की, हे प्रकरण पती-पत्नीच्या आपसी भांडणाचे आहे. इमरान खान आधीच विवाहित आहे. त्याने आपल्या पहिल्या पत्नीशी इस्लामनुसार लग्न केले होते, त्यामुळे या प्रकरणात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच याप्रकरणी कोणतीही कारवाई केली जाईल. त्याचवेळी डीसीपी दीपक भुकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महिलेला आपली बाजू मांडण्याची सूचना केली आहे. यासोबतच या प्रकरणाचे तपासकर्ते आता पीडितेने दिलेल्या पुराव्यांचाही त्यांच्या चर्चेत समावेश करतील, असेही सांगण्यात आले आहे.