भुवनेश्वर : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या अपघातात एक रेल्वे रुळावर हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. यामुळे ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. हे डबे दुसऱ्या रेल्वे रुळावर पोहोचले. याच ट्रॅकवरून यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेन येत होती. या ट्रेनची रेल्वे रुळावर पडलेल्या डब्यांना धडक बसली आणि या तीन रेल्वेच्या अपघातात जवळपास २५० प्रवाशांचा मृत्यू झाला.
व्हिडिओमध्ये चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचे १० ते १२ डबे या धडकेनंतर उलटले आहेत. तर दुसऱ्या गाडीचे ३ ते ४ डबे रुळावरून घसरले आहेत. ९ डब्बे ट्रॅक सोडून बाजूला उलटले. हा अपघात इतका भयंकर आणि भीषण आहे की ट्रेनच्या काही बोगींचा अक्षरश: चुराडा झाला आहे.मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.