राहुल गांधींना हिंसाचारग्रस्त भागात जाण्यापासून रोखले

    29-Jun-2023
Total Views |
Congress Leader Rahul Gandhi On Manipur Tour

मणिपूर
: काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करत असताना त्यांचा ताफा रोखण्यात आला असून इंफाळपासून २० किमी अंतरावरील बिष्णूपूर जिल्ह्यात त्यांना रोखण्यात आले. मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी दोन दिवसीय दौऱ्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, मणिपूर हिंसाचारातील पीडित कुंटुंबीयांची भेट ते घेणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यात हिंसाचारातील पीडितांची भेट घेणार होते, परंतु, त्यांना हिंसाचारग्रस्त भागात जाण्यापासून पोलीसांनी रोखले. परिणामी, त्यांना इंफाळ येथून माघारी परतावे लागले. यादरम्यान काँग्रेस नेते नागरी समाजाच्या अनेक प्रतिनिधींना भेटणार आहेत. दरम्यान, इम्फाळहून विष्णुपूरला जात असताना राहुलच्या ताफ्याला पोलिसांनी अडवले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यावर भाजप नेते अमित मालवीय यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राहुल गांधी हे काही शांतीदूत नसून त्यांनी एफआयआर दाखल झाल्याच्या एक दिवसानंतर मणिपूर दौरा केला आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, भाजप नेते अमित मालवीय यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी राहुल गांधी इंफाळमध्ये आले होते. या दौऱ्याचा भाजप नेत्यांकडून खरपूस समाचार घेण्यात आला. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले, राहुल गांधी हे केवळ राजकीय मसिहा आहेत, शांततेचे मसिहा नाहीत, अशी खिल्ली मालवीय यांनी उडवली. तसेच, काँग्रेस ही फक्त संधिसाधू आहेत त्यांना हे प्रकरण उकळत ठेवायचे आहे, असा आरोप त्यांनी केला.