राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय!
29-Jun-2023
Total Views |
मुंबई : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होणार असल्याचे समजते आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. हजारो सहकारी व गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी व मतदारांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण असल्याने, शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असते. राज्यात ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. राज्यातील ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.