अल्पवयीन मुलाने वाहतुकीचे नियम मोडले; पोलिसाने असं काही केलं की अख्खं फ्रान्स पेटले!

    29-Jun-2023
Total Views |
Anger in Paris after police kill teen in traffic stop

पॅरिस
: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने १७ वर्षीय मुलाची हत्या केल्यामुळे हिंसाचार उसळला. प्राणघातक गोळीबारानंतर पॅरिसमध्ये अशांतता पसरली आहे, आंदोलक आणि पोलिसांच्या संघर्षाच्या बातम्या समोर येत आहेत.

वास्तविक, पॅरिसमध्ये नाहेल एम नावाच्या अल्पवयीन मुलाने वाहतूक पोलिसांसमोर कार थांबवण्यास नकार दिला. त्यानंतर एका पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेचे वृत्त पसरताच लोक रस्त्यावर उतरले आणि नैनटेरे शहरात हिंसाचार पसरला.सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये दि. २८ जून रोजी कार जाळण्यात आल्या आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली.
 
दरम्यान पोलीसांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिमेकडील लिली आणि टूलूज या उत्तरेकडील शहरात पोलिसांची निदर्शकांशी चकमक झाली आणि फ्रान्सच्या राजधानीच्या दक्षिणेस एमिएन्स, डिजॉन आणि एस्सोन प्रशासकीय विभागातही अशांतता पसरली. पॅरिसमध्ये हा हिंसाचार पसरल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत १५० जणांना अटक केली आहे. या लोकांवर सरकारी वाहने पेटवल्याचा आरोप असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
दरम्यान फ्रेंच मीडियाने पॅरिसमधील इतर अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनांची माहिती दिली. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गोळीबाराला “चुकीचे आणि अक्षम्य” असे म्हटले होते. तरुणावर गोळी झाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा तपास सुरू आहे. त्याचवेळी, गृह मंत्रालयाने शांतता राखण्याचे आवाहन केले असून पॅरिसमध्ये २००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

त्याचवेळी मानवी हक्क समूहाने फ्रान्समधील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींमध्ये पद्धतशीर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. अध्यक्ष मॅक्रॉन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हि़डीओत दोन पोलिस अधिकारी ड्रायव्हरशी बोलत होते.त्यानंतर त्यातील एका अधिकाऱ्यांने ड्रायव्हरला गोळी मारली. त्यानंतर स्थानिक लोकांमध्ये संताप पसरला असून जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत.