अमेरिकन अब्जाधीश जेम्स क्राउन यांचे अपघाती निधन

    27-Jun-2023
Total Views |
james crown billionaire investor Died In Car Crash

मुंबई
: अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जेम्स क्राउन यांचे कार अपघातात निधन झाले असून त्यांच्या निधनाने गुंतवणूक विश्वात शोककळा पसरली आहे, दि. २५ जून रोजी कारने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. एका रेसमध्ये कारची धडक बॅरियरशी होऊन अपघात घडला. जेम्स क्राऊन हे शिकागोमधील श्रीमंत प्रस्थ होते. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या डिनर कार्यक्रमामध्ये जेम्स क्राऊन सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले आणि कुटुंबीय आहेत.

जेम्स क्राउन हे एक अमेरिकन उद्योगपती, अब्जाधीश गुंतवणूकदार तसेच जेपी मॉर्गन चेसचे संचालकपदी होते. रविवारी दि. २५ जून रोजी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करताना कोलोरॅडो येथे कार रेसिंग अपघात झाला. सीएनएनच्या वृत्तानुसार, वुडी क्रीकमधील अस्पेन मोटरस्पोर्ट्स पार्क येथे एका इम्पॅक्ट बॅरियरला आदळल्यानंतर सिंगल-वाहन अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जेम्स क्राउन यांच्या निधनावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केले. ते म्हणाले, जेम्स क्राउन हे शिकागोचे एक आधारस्तंभ होते, तसेच, त्यांनी नेहमीच आपल्या शहराला भरभराटीस कसे नेता येईल असे स्थान बनवण्याबद्दल मनापासून काळजी घेतली. ओबामा म्हणाले. मिशेल आणि आपण देखील त्याला एक प्रिय मित्र म्हणण्यास खूप भाग्यवान होतो. त्यांच्या अपघाती निधनाने आम्ही दु:खी आहोत आणि या कठीण काळात आम्ही पॉला आणि त्यांच्या कुटुंबासमवेत आमच्या संवेदना आहेत असे ते म्हणाले.