पुणे : सदाशिव पेठेतील MPSC परिक्षा देणाऱ्या तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळते आहे. पण तरुणीला वाचवणारा तरुण MPSC चा विद्यार्थी होता, असे समजते आहे. काही दिवसापूर्वी, राजगडाच्या पायथ्याशी MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हीच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातुन तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला.
हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकी जवळ घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.