राज्यात केवळ ३५ सारस शिल्लक

सारस गणनेचा संपुर्ण अहवाल जाहिर

    26-Jun-2023
Total Views |

saras

मुंबई ( विशेष प्रतिनिधी): विशेषतः गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आढळणाऱ्या दुर्मिळ सारस पक्ष्याच्या गणनेचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यंदाच्या सारस गणनेत राज्यभरात ३५ पक्षी आढळले आहेत. यात गोंदिया जिल्ह्यात ३१ तर भंडारामध्ये ४ सारसांची नोंद करण्यात आली आहे.



saras

महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस पक्ष्यांची २०१७ सालापासुन नियमितणे सारसगणना करण्यात येते. पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत सेवा (Sustaining Environment and Wildlife Assemblage) या संस्थेमार्फत ही गणना केली गेली. वनविभाग तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने पारंपारिक आणि शास्त्रीय पद्धतीने सारस गणना केली गेली. सात दिवसांच्या सारस गणने दरम्याण, गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील एकूण १००-१२० ठिकाणी सेवा संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र अन्य स्वयंसेवी संस्था आणि गोंदिया वनविभाग व बालाघाट यांच्या कर्मचार्‍यांनी ही सारस गणना पार पाडली. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार गोमदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याची ३ घरटी आढळली होती. तर, भंडारा जिल्ह्यात केवळ ३ सारस पक्षी शिल्लक असल्याचे चित्र होते. यंदा भंडाऱ्यातील आकडा एकने वाढला असुन एकुण चार पक्षी जिल्ह्यात आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ४९ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.



saras
बाघ आणि वैनगंगा नद्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्याला विभागतात. भौगोलिक दृष्टीकोनातून, नदीच्या दोन्ही बाजूंच्या प्रदेशाच्या जैवविविधतेमध्ये बरेच साम्य आहे. म्हणून, काही सारस पक्ष्यांच्या जोड्या अधिवास आणि अन्नासाठी दोन्ही प्रदेशांमध्ये समान प्रमाणात फिरताना आढळतात. गेल्या तीन वर्षांची आकडेवाकी लक्षात घेता सारस पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या लक्षणियरित्या कमी झाली आहे. त्यांना आवश्यक असलेले अधिवास क्षेत्र वाढविणे, तसेच संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील असणे नितांत गरजेचे आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.