ओडिशा : गंजम जिल्ह्यात मध्यरात्री दोन बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ प्रवासी जखमी आहेत. हा अपघात गंजम जिल्ह्यातील दिगपहांदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (OSRTC) आणि एका खासगी बसमध्ये हा अपघात झाला. जखमींना तात्काळ एमकेसीजी मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताबद्दल माहिती देताना पोलीस महानिरीक्षक सरवना विवेक यांनी सांगितलं की, "प्राथमिकदृष्ट्या दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाल्याचं दिसत आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास हा अपघात झाला. खासगी बसमधील अनेक प्रवासी ठार आणि जखमी झाले आहेत. सरकारी बसमधील प्रवासी मात्र किरकोळ जखमी आहेत."