नवी दिल्ली : १९१२ मध्ये समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी ५ अब्जाधीशांना घेऊन निघालेली टायटन पाणबुडीचा अपघात झाला. त्यात पाणबुडीमध्ये असणाऱ्या पाचही अब्जाधीश प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक देशांचे बचाव पथक त्या हरवलेल्या पाणबुडीचा शोध घेण्यात गुंतले होते. यूएस कोस्टगार्ड्सने सांगितले की, दि. २२ जून रोजी टायटॅनिक जहाजाजवळ त्याचा अवशेष सापडला. त्यानंतर पाणबुडीची ऑनर कंपनी ओशनगेटने अपघाताची पुष्टी केली.
ओशनगेट कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टायटन पाणबुडीतील पाच ही प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आम्ही या अपघातबद्दल शोक व्यक्त करतो. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही या पाचही प्रवाशांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मात्र हा भीषण अपघात कसा घडला याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की, १८ जून रोजी सकाळी ६ च्या सुमारास बेपत्ता झालेल्या पाणबुडीच्या क्रूकडे उत्तर अटलांटिक महासागराच्या प्रवासादरम्यान फक्त चार दिवसांचा ऑक्सिजन होता. त्यामुळे दि. २२ जून रोजी सकाळी ऑक्सिजन संपला होता.
५ दिवस शोध सुरू असूनही शोधकर्ते वाचवू शकले नाहीत
टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यासह अनेक देशांतील शोधकर्त्यांचे पथक शोध मोहिमेत सहभागी झाले. मात्र, ४ दिवस समुद्रात ती पाणबुडी कोणालाही सापडली नाही. शोध मोहिमेला ९६ तास उलटून गेले होते आणि आधी सांगितल्याप्रमाणे पाणबुडीमध्ये फक्त ४ दिवसांचा ऑक्सिजन होता, तो संपला. यूएस कोस्ट गार्डने एक निवेदन जारी केले की, त्यांना मध्य अटलांटिक महासागरात १९१२ मध्ये टायटॅनिक जहाज ज्या ठिकाणी बुडाले होते त्याजवळ पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. तथापि, १८ जून २०२३ रोजी बेपत्ता झालेल्या पाणबुडीचे हे जहाज त्याच पाणबुडीचे आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
अपघाताचे कारण काय असेल, पाणबुडी कशी बुडाली?
पाणबुडीच्या अपघाताची कारणे जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता झालेल्या पाणबुडीमध्ये १० वर्षांचा गेमिंग कंट्रोलर वापरण्यात आला होता, ज्याने काम करणे बंद केले असावे, असे एका अहवालात सांगण्यात आले. त्याचबरोबर पाणबुडी खोलवर जात असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आणि, टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्याला धडकल्यानंतर ती अडकली असण्याचीही शक्यता आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.
गोळा केलेल्या पुराव्यांचे मूल्यांकन
यूएस अधिकाऱ्यांनी २२ जून रोजी एका ट्विटमध्ये अपघाताविषयी सांगितले की, ओशनगेटची टायटन पाणबुडी शोधण्याचे अभियान संपले आहे, त्यात ५ अब्जाधीश प्रवासी होते, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र, तेथून जमा झालेल्या पुराव्यांच्या आधारे माहितीचे मूल्यमापन केले जात आहे.
पाणबुडीवर बसलेले पाच अब्जाधीश प्रवासी कोण होते?
पाणबुडीतील पाच अब्जाधीश प्रवासी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेले होते. ब्रिटिश-पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद (अँग्लो कॉर्पचे उपाध्यक्ष) आणि त्यांचा मुलगा सुलेमान, ब्रिटीश अब्जाधीश हमिश हार्डिंग, फ्रेंच पर्यटक पॉल-हेन्री नार्गिओलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश हे प्रवाशी पाणबुडीवर होते.