उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं दुकान बंद केलं! : जे .पी.नड्डा

    23-Jun-2023
Total Views |
J.P. Nadda on Uddhav Thackeray

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ओडिशातील भवानीपटना येथे भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात जनसमुदायाला संबोधित करताना विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. नड्डा म्हणाले की, हिंदूंची न्याय-ह्क्कांची गोष्ट करणारे उद्धव ठाकरे विरोध पक्षांसह पाटनामध्ये दाखल झालेत. त्यामुळे हिंदूहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, जर काँग्रेससोबत हातमिळवणी करायला लागली तर मी माझे दुकान कायमचे बंद करेन. पण आता उद्धव ठाकरेंच्या विरोधी पक्षांशी केलेल्या हातमिळवणी मुळे कोणी दुसऱ्यांने नाही तर उद्धव ठाकरेंनीच दुकान बंद करून टाकला आहे, अशी टीका जे. पी. नड्डा यांनी केली आहे.

तसेच विरोधी पक्षाने किती ही टीका केली तरी १४० कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी आहे हे विरोधकांनी विसरू नये, असे ही नड्डा म्हणाले. त्याचबरोबर ओडिशात सरकार नवीन पटनायक चालवत नसून दुसरं कोणीतरी चालवयं. त्यामुळे विरोधी पक्ष सोडा, सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे कोणी ऐकत नाही. म्हणून या सगळ्याचा परिणाम म्हणून ओडिशात पुढचे सरकार भाजपचेच असेल, मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, असे ही जे.पी .नड्डा म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा, प्रभारी डी. पुरंदेश्वरी, कालाहंडीचे खासदार बसंत पांडा, प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आदी उपस्थित होते.