मुंबईत ईडीचे धाडसत्र! बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी १० हून अधिक ठिकाणी छापेमारी

    21-Jun-2023
Total Views |

ED raid 
 
 
मुंबई : मुंबईत ईडीच्या धाडसत्राला सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांवर ईडीची नजर आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणातही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल १० ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
 
मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी सुरू आहे. कोविड काळातील कंत्राटांप्रकरणी इडी चौकशी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कोविड काळात दिले गेलेल्या कंत्रांटांसंदर्भात छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे.
 
बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.